esakal | देशप्रेमी युवकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी मदत करेल- राज ठाकरे । MNS
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे

देशप्रेमी युवकांना मनसे सर्वतोपरी मदत करेल- राज ठाकरे

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर: जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून गेल्या वर्षी अभिनव पद्धतीने त्या शिखरावर शिवजयंती साजरी करण्याची अविस्मरणीय कामगिरी महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम तळदेव येथील तरुण अक्षय जंगम याने केली होती. अक्षय जंगम याचे हे धाडस युवा पिढीसाठी दीपस्तंभ ठरले आहे. अशा अविलक्षण देशप्रेमी युवकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी मदत करेल,अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा: ठाण्यात कोव्हिशिल्ड ऐवजी दिली कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या आजाराची लस

अक्षय जंगम याने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी अक्षय जंगमच्या धाडसाचे कौतुक केले. अक्षय याने गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२१ च्या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर यशस्वी रित्या सर करून शिवजयंती साजरी केली होती.

यावेळी ठाकरे यांनी अक्षय जंगमचा सत्कार करून पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या ! High range book of World record आणि India record चे medal घालून गौरविण्यात आले. त्यावेळी सोबत मनसे वरळी माजी विभाग अध्यक्ष संतोष धुरी, विद्यार्थी सेना वॉर्ड अध्यक्ष भावेश कोळी, वाहतुक सेनेचे उप विभाग संघटक भाऊ कोठेकर, व उपशाखाध्यक्ष परेश कोचरेकर उपस्थित होते.

loading image
go to top