ठाण्यात कोव्हिशिल्ड ऐवजी दिली कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या आजाराची लस

ठाण्यातही लसीकरणादरम्यान एका नर्सने मोठी चूक केली आहे.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal media

ठाणे: आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान (vaccination) वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून (medical staff) वेगवेगळ्या चुका घडल्याचे आपण पाहिले आहे. एकाचवेळी कोव्हिशिल्ड (Covishield vaccine) आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे डोस एकाच व्यक्तीला देणे असे प्रकार घडले आहेत. आता ठाण्यातही लसीकरणादरम्यान एका नर्सने मोठी चूक केली आहे. ठाण्यातील आरोग्य केंद्रावर कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चुकून रेबीज प्रतिबंधक लस (anti-rabies vaccine) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे महापालिकेसाठी काम करणाऱ्या या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची बाधा होण्याचा धोका असतो. एका व्यक्तीला रेबीजची लस कोविड लस म्हणून देण्यात आली. सोमवारी कळव्याच्या अटकोनेश्वर आरोग्य केंद्रामध्ये ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

Corona Vaccination
सगळं बंद ठेवून विरप्पन गँगचे घोटाळे लपणार नाहीत - मनसे

राजकुमार यादव नावाचा व्यक्ती कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर आला होता. पण चुकून तो ARV इंजेक्शन देण्याच्या रांगेत जाऊन बसला.

Corona Vaccination
मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

नर्सने राजकुमारचा केस पेपर न तपासता त्याला रेबीज प्रतिबंधक लस देऊन टाकली. हा प्रकार समोर आल्यानंतर यादवला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून नर्सला निलंबित करण्यात आले आहे. लस देण्याआधी रुग्णाचा केस पेपर तपासणे नर्सची जबाबदारी होती, असे ठाणे महापालिकेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com