Satara Crime : विनयभंगप्रकरणी २४ तासांत दोषारोपपत्र; दोन घटनांमध्ये संशयितांना अटक
शहर पोलिसांनी विनयभंगाच्या दोन गुन्ह्यांमध्ये संशयितांना अटक करून २४ तपासात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. येथील केबीपी कॉलेजसमोर तसेच देगाव फाट्यावर अमरलक्ष्मी परिसरात मुलीचा व एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता.
Accused arrested in two separate molestation casesSakal
सातारा : महिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर परिसरात घडलेल्या विनयभंगाच्या दोन घटनांमध्ये संशयितांना अटक करून शहर पोलिसांनी २४ तासांमध्ये संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहेत.