esakal | 'त्या' पैशांची उदयनराजेंना जिल्हाधिकाऱ्यांची मनिऑर्डर
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

'त्या' पैशांची उदयनराजेंना जिल्हाधिकाऱ्यांची मनिऑर्डर

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : राज्य शासनाच्या लॉकडाउनला विरोध दर्शवत खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मांगो आंदोलन करत जमविलेले साडेचारशे रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भीक मांगो आंदोलनातील रोकड न स्वीकारता एका ओळीचे पत्र लिहून ते साडेचारशे रुपये पुन्हा मनिऑर्डरव्दारे खासदार उदयनराजेंच्या राहत्या पत्त्यावर पाठवून दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने वीकेंड लॉकडाउन पुकारला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत खासदार उदयनराजेंनी शनिवारी (ता.10) पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भीक मांगो आंदोलन केले होते. आंदोलनावेळी उदयनराजेंनी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनावर टीका करत आपला संताप व्यक्‍त केला होता. यानंतर त्यांनी थाळी फिरवत उपस्थितांकडून पैसे जमा केले. भीक मांगो आंदोलनातून जमा केलेल्या साडेचारशे रुपयांची रोकड असणारी थाळी घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे

या वेळी त्यांनी लॉकडाउन मागे घ्यावाच लागेल, न घेतल्यास असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन लॉकडाउनबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच जिल्हाधिकारी सिंह यांनी ती रोकड कायदेशीररित्या स्वीकारता येणार नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून ते 450 रुपये पुन्हा मनिऑर्डरव्दारे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठविले आहेत. या रकमेबाबत उदयनराजे काय निर्णय घेतात, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे 'भीक मागो' आंदोलन; Lockdown ला खासदारांचा तीव्र विरोध

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top