Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे

Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे

सातारा : लॉकडाउनला विरोध दर्शवत शासनाचा निषेध करण्यासाठी रविवारी खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) दुपारी दीडच्या सुमारास पोवई नाका येथील शिवछत्रपती यांच्या पुतळ्याजवळ आले. शिवछत्रपतींना अभिवादन करत त्यांनी समोरील आंब्याच्या झाडाखाली दोन पोती टाकून ठाण मांडले. सोबतची ताटली समोर ठेवत याठिकाणी त्यांनी भीक मांगो आंदोलन सुरू केले. त्यांनी अचानक भीक मांगो आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
 
जमलेल्यांना ताटलीत पैसे टाकण्यास सांगत उदयनराजेंनी आंदोलनामागील भूमिका मांडत तीव्र शब्दात सरकारवर टीका केली. आंदोलनादरम्यान जमलेल्या रकमेची ताटली घेऊन उदयनराजेंनी नंतर चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी जमलेली रक्कम ताब्यात घेण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना आवाहन केले. मात्र, कोणीही न आल्याने उदयनराजेंनी जोरात कोणी आहे का? आमचे ऐकायला.. अशी जोरात हाक मारली.
 
हाक मारूनही कोणी येत नसल्याने उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रोकड ताब्यात घेण्याची विनंती सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना केली. मात्र, मला तो अधिकार नसल्याचे सांगत मांजरे यांनी ती रोकड स्वीकारली नाही. यानंतर उदयनराजेंनी सोबत असणाऱ्यांना ताटलीत जमलेली रोकड मोजण्यास सांगितले. रोकड मोजत असतानाच मोज बाबा आपल्याकडे नोटा मोजण्यासाठी वाझेसारखी मशिन नसल्याची टिप्पणी केली. या टिप्पणीमुळे त्याठिकाणी हशा पिकला. 

Video पाहा : उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे

मोजणीअंती आंदोलनात साडेचारशे रुपये जमल्याचे समारे आल्यानंतर त्यांनी ती घेण्यासाठी कोणीही येत नसल्याचे पाहून बघा कोण येतंय का नाहीतर वाटून घेऊ, अशी कोटी केली. याच काळात पोलिस अधिकाऱ्यांनी फोनाफोनी करत रोकड ताब्यात घेण्यासाठी महसुली अधिकाऱ्यांना त्याठिकाणी बोलावले. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांनी त्याठिकाणी येत उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलनातून जमा केलेले 450 रुपये ताब्यात घेतले. या वेळी उदयनराजेंनी People are not angry, but hungry, and they do anything not out of anger but out of hunger अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर जिल्ह्यात उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशारा दिला. त्यानंतर उदयनराजे आपल्या स्टाईलमध्ये त्याठिकाणाहून निघून गेले. 

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com