
कास : निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सातारा, जावळी, महाबळेश्वर आणि पाटणच्या डोंगरदऱ्यात असलेले धबधबे मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्सची पावले या स्थळी वळली आहेत.