
ढेबेवाडी: विभागातील अनेक गावांत भूकंपाचे धक्के, वादळ, पाऊस यामुळे अगोदरच कमकुवत झालेल्या घरांच्या पडझडीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. महिनाभरात ३१ घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. नुकसानीचे पंचनामे करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.