रुग्णालय खासगी संस्थेला दिल्यास माझ्याशी गाठ; खासदार रणजितसिंहांचा रामराजेंना इशारा

Ramraje Naik-Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkaresakal

फलटण शहर (सातारा) : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) खासगीकरणाचा घाट घालून अन्य संस्थेला द्यायचा प्रयत्न चालला आहे. जर मालोजीराजेंचा वारसा सांगत असाल, तर खासगीकरणाचा घाट न घालता हे रुग्णालय शासनच चालवेल, यासाठी प्रयत्न करा, अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी नाव न घेता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्यावर केली. (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar Criticizes Speaker Ramraje Naik-Nimbalkar Satara Political News)

Summary

सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले झिरपवाडीतील ग्रामीण रुग्णालय खासगीकरणाचा घाट घालून अन्य संस्थेला द्यायचा प्रयत्न चालला आहे.

या संदर्भात रणजितसिंह यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. माजी आमदार (कै.) चिमणराव कदम यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयासाठी झिरपवाडी परिसरात आठ एकर जागेत ग्रामीण रुग्णालय उभारले गेले; परंतु राजकीय विरोधामुळे ते सुरू होऊ शकले नाही. गेली 25 वर्षे तालुक्‍यात राजेगटाची सत्ता आहे; पण हे रुग्णालय सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. खासदार झाल्यानंतर आपण पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीत या रुग्णालयाचे महत्त्व सांगितले; परंतु या रुग्णालयाला निधी उपलब्ध होऊ नये, यासाठी रामराजेंनी प्रयत्न केल्याचा आरोपही खासदार निंबाळकर यांनी केला आहे. या प्रश्नी सतत पाठपुरावा व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे इस्टिमेट करून शासनाकडे सादर केले.

Ramraje Naik-Nimbalkar
Don't Worry! महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' असलेल्या कोयनेत मुबलक पाणीसाठा

मी पाठपुरावा करत असल्याचे लक्षात येताच हे ग्रामीण रुग्णालय खासगीकरणाच्या तत्त्वावर चालवण्यासाठी रामराजेंनी पाठपुरावा केला. हे रुग्णालय खासगीकरणाकडे गेले तर सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे अवघड होईल. खासदार फंडातून इमारत दुरुस्ती 50 लाख रुपयांचा निधी करण्यासाठी देण्याचे पत्रही मी दिले आहे. सध्याची कोरोना महामारीची अवस्था पाहता हे रुग्णालय लवकर सुरू होणे आवश्‍यक आहे. शासनाने हे रुग्णालय चालवण्यास पैसे नाहीत, हे जाहीर केले तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या खासदारांकडूनही निधी उपलब्ध करू; परंतु जर हे रुग्णालय कोणत्याही खासगी संस्थेला देण्याचा प्रयत्न केल्यास जनतेला सोबत घेऊन सरकारविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार निंबाळकर यांनी दिला आहे.

Ramraje Naik-Nimbalkar
स्मिता, कशी वागते हे लाेकांना माहितेय! आराेप हास्यास्पद

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकरांचा वारसा घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी हे ग्रामीण रुग्णालय मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहेत. तिसऱ्या लाटेसाठी वखार महामंडळाच्या जागेमध्ये 500 रुग्णांसाठी जम्बो सेंटर उभे करण्यासाठी रामराजेंनी प्रयत्न करावा, त्यासाठी आपण त्यांना संपूर्ण सहकार्य करू.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार

MP Ranjitsingh Naik-Nimbalkar Criticizes Speaker Ramraje Naik-Nimbalkar Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com