स्मिता, कशी वागते हे लाेकांना माहितेय! निवडणुका डाेळ्यासमाेर ठेऊन झालेला प्रकार हास्यास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smita ghodke

स्मिता, कशी वागते हे लाेकांना माहितेय! आराेप हास्यास्पद

सातारा : पालिकेच्या कस्तुरबा आरोग्य केंद्रात (kasturba hospital) विनाकारण गर्दी व अरेरावी करून टोकन नसतानाही लसीकरण (vaccination) करण्यास भाग पाडल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा व नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहा जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (shahupuri police station) गुन्हा दाखल झाला आहे. (satara-marathi-news-police-charged-six-along-with-corporator-interference-kasturba-vaccination-center)

स्मिता चंद्रशेखर घोडके, चंद्रशेखर राजाराम घोडके, पद्मावती दत्तात्रय नारकर, सुभाषचंद्र भवरीलाल हिरण (रा. सातारा), रसीला सुभाषचंद्र हिरण, दीपलक्ष्मी सचिन शालगर (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कस्तुरबा केंद्रातील परिचारिका सुजाता सुरेश साठे (रा. बावधन, ता. वाई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान याबाबत नगरसेविका घाेडके यांनी हा प्रकार निवडणुका डाेळ्यासमाेर ठेऊन केल्याचे ई-सकाळशी बाेलताना नमूद केले.

हेही वाचा: FACT CHECK : सातारकरांनो! तुमच्या मोबाईलवर आलेला बिबट्याचा VIDEO सोनगावचा नाही

कोरोनाचे लसीकरण (covid19 vaccination) जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सुरू आहे. लशीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्रावर सर्वसामान्य नागरिक पहाटे तीनपासून उभे राहात आहेत. या नागरिकांना लसीकरणासाठी टोकन दिले जाते. त्यानंतर गर्दी टाळण्यासाठी वेळेनुसार त्यांना लसीकरणाला बोलावले जाते. मात्र, सर्वसामान्यांच्या परवडीचा विचार न करता अनेक केंद्रांवर काही स्थानिक नेतेमंडळी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची वशिलेबाजी व दादागिरी सुरू आहे. त्याला डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्यसेवकही वैतागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यासमोरही हा विषय गेला होता. त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: कर्म माझं, सात तास रांगेत उभं राहूनही लस मिळाली नाही

त्यानंतरही दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. 29) सकाळी साडेअकराच्या सुमारास कस्तुरबा आरोग्य केंद्रात असाच प्रकार सुरू असल्याचे समोर आले. तेथे नगरसेविका स्मिता घोडके, त्यांचे पती चंद्रशेखर राजाराम घोडके व काही लोकांकडून प्रकार झाला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा केंद्रात टोकन वाटप करून लसीकरण सुरू होते. या वेळी सर्वजण रांगेत उभे राहून शासन नियमांचे पालन करत होते. या वेळी मात्र, नेमके याचवेळी संशयित तेथे आले. त्यांनी आरोग्य केंद्रात विनाकारण गर्दी केली. अरेरावी करत टोकन नसतानाही लसीकरण करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे येथील डॉक्‍टर, परिचारिका व आरोग्यसेवक घाबरले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसही घटनास्थळी आले होते. रात्री उशिरा साठे यांच्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

हेही वाचा: पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

ब्लाॅग वाचा

नगरसेविका स्मिता घाेडके यांनी त्यांच्यावर हाेत असलेला आराेप हा काेणीतरी आगामी काळातील निवडणुका डाेळ्यासमाेर ठेऊन केल्याचे 'ई-सकाळ'शी बाेलताना सांगितले. त्या म्हणाल्या गरजूंसाठी कस्तुरबा रुग्णालय खूप उपयुक्त ठरले आहे. तेथे चांगल्या पद्धतीने लसीकरण सुरु आहे. त्यादिवशी नागरिकांनी आम्हांला तेथे बाेलाविले म्हणून आम्ही गेलाे हाेताे. मुख्याधिकारी अभिजीत बापट देखील तेथे आले हाेते. आम्ही त्यांनाही सांगितले ज्या नागरिकांचे कूपन आहेत. त्यांचे लसीकरण झाले पाहिजे. त्याच दिवशी आमच्या दाेघांची (माझे व पतीचे) नाेंदणी झाली हाेती. काेणताही गैरप्रकार करुन मी लस घेतलेली नाही. दमदाटी करुन लसीकरण झाले हा आराेप चुकीचा आहे. आगामी काळात निवडणुक जवळ आल्याने असा प्रकार काेणी तरी केला असावा.

खरं तर मला हे हास्यपास्द वाटल्याचे घाेडकेंनी नमूद केले. त्या म्हणाल्या आम्ही नागरिकांसाठी धावत गेलाे आहाेत. माझ्याबाबतीत काेणीही गैरअर्थ काढणार नाही या मला विश्वास आहे. जनतेला माहित आहे 20 वर्षात स्मिता घाेडकेंनी काेणाला दमदाटी केलेली नाही. लसीकरणासाठी तर मुळीच नाही. गेली अनेक वर्ष मी आणि माझे पती समजासाठी कार्यरत आहाेत हे जनता जाणते असेही घाेडकेंनी नमूद केले.

हेही वाचा: सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे

loading image
go to top