'नीरा देवघर’च्या कामांसाठी केंद्राकडून निधी देऊ

खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांची भेट
Minister Gajendrasinh shekhawat
Minister Gajendrasinh shekhawatesakal

फलटण शहर (सातारा) : नीरा-देवघर प्रकल्पाच्या (Nira-Deoghar project) लाभ क्षेत्रातील प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Minister gajendrasinh shekhawat) यांनी दिल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी दिली. खासदार निंबाळकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय येथे शेखावत यांची भेट घेऊन नीरा-देवघर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील प्रलंबित कामांविषयी चर्चा केली. त्यावेळी मंत्री शेखावत यांनी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही खासदार निंबाळकर यांना दिली.

Summary

नीरा-देवघरच्या पाण्याचा खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील काही गावांना फायदा होणार आहे.

या चर्चेदरम्यान १९८४ ला मिळालेल्या मंजुरीपासून २००७ रोजी धरण बांधकाम पूर्ण होऊनही लाभक्षेत्रातील प्रलंबित कामे किती अपूर्ण राहिली? ती का अपूर्ण राहिली तसेच राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे सीडब्ल्यूसीची मान्यता मिळवण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी या धरणाचे पाणी दुष्काळी पट्ट्याला न देता स्वतःच्या मतदारसंघाकडे नेता यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केला. नीरा-देवघरचे पाणी लाभक्षेत्रातील गावांना मिळण्याऐवजी बारामतीला कसे नेले गेले व आजपर्यंत पुढील कामे कशी रखडवली गेली याची माहिती खासदार निंबाळकर यांनी मंत्री शेखावत यांना चर्चेवेळी दिली. नीरा-देवघर कामास निधी मिळाला तर ही कामे कशा पद्धतीने पूर्ण करता येतील, या बाबत माहिती दिली.

Minister Gajendrasinh shekhawat
जलसंपदा विभागाच्या 'टेंडर'मध्ये घोटाळा; प्रधान सचिवांकडे तक्रार

नीरा-देवघरच्या पाण्याचा खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील काही गावांना फायदा होणार आहे. या पाण्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या भागाचा कायम दुष्काळी भाग हा कलंक पुसला जाईल. त्यामुळे याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून या कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी केली. या प्रकल्पाच्या कामांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यापुर्वी चर्चा झाली आहे. पंतप्रधानांनीही याबाबत सकारात्मक भुमिका घेतली आहे. त्यामुळे अगामी काळात लवकरच नीरा-देवघरच्या लाभ क्षेत्रातील कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी खासदार निंबाळकर यांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com