Sanjay Raut : 'पाटणचं नाव महाराष्ट्रात बदनाम झालंय, गद्दारीमुळं त्यांना तोंडवर करून चालायची लाज वाटतेय'

जसा खोक्याचा भूकंप झाला, तसे पाटण हे भूकंपांचे केंद्र आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal
Summary

आज पाटणचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे. एका बाजूला ५० खोके, गद्दारी, टक्केवारी यामुळे बाहेर फिरताना वर तोंड करून चालायची लाज वाटते.

मल्हारपेठ : जसा खोक्याचा भूकंप झाला, तसे पाटण हे भूकंपांचे केंद्र आहे. महाराष्ट्रात कुठेही भूकंप झाला तरी पाटणला केंद्रबिंदू शोधतात. अनेक धक्के पचवून हा तालुका उभा राहिला आहे.

त्यामुळे येथील जनतेला अशा धक्क्यांचं काही वाटत नाही, त्यातूनही हा तालुका उभा राहतो. हा कसला धक्का मुंबईला भाऊचा धक्का बरा, असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी लगावला. मल्हारपेठ येथे विविध विकासकामांच्‍या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते व खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील सातारा, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राष्‍ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख भानुप्रताप (हर्षद) कदम, मल्हारपेठच्‍या सरपंच धनश्री कदम आदी उपस्थित होते.

Sanjay Raut
Raju Shetti बाबत कोर्टानं घेतला मोठा निर्णय; 'या' प्रकरणातून शेट्टींसह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

खासदार राऊत म्हणाले, मला पाटण तालुक्यात यायचेच होते; पण याअगोदर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावले नाही. सध्या ते मालक-पालक-चालक तेच आहेत तर महाराष्ट्रात बाळासाहेब देसाई यांची ओळख लोकनेते म्हणून आहे, होती आणि राहणार आहे.

Sanjay Raut
Good News : राज्यात दोन टप्प्यात तब्बल 'इतक्या' शिक्षकांची होणार भरती; दीपक केसरकरांची मोठी घोषणा

बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा अतिशय जवळचा घरोब्याचा संबंध होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब देसाई हे शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नेते होते. काँग्रेसचे नेते असले तरी लोकनेते होते. मात्र, त्यांच्या नातवाला कधीही लोकनेता होता येणार नाही, हे फेक नेते आहेत.

यावेळी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, की पाटण तालुक्याचा विकास करायचा असला तर दूरदृष्टी व सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांकडे ही सत्ता गेली पाहिजे. आज पाटणचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे. एका बाजूला ५० खोके, गद्दारी, टक्केवारी यामुळे बाहेर फिरताना वर तोंड करून चालायची लाज वाटते; कारण गद्दारीचे मूळ हे या पाटणमधूनच सुरू झाले आहे.

Sanjay Raut
Gadhinglaj : उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविकेसह पोलिसाला कोठडी, न्यायालयात तणावाचं वातावरण

हर्षद कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर आम्ही विकासाच्या कामांना महत्त्व दिले. दादासाहेब पानस्कर यांनी प्रास्‍ताविक केले तर तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com