esakal | दहावीतील गुणवंतांना उदयनराजे म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

udyanraje bhosale

आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या टप्प्यावर तुम्ही सर्व लहान मित्रांनी भविष्यातील नवीन संधी आणि आपल्यातील वेगळेपण या गोष्टींचा विचार करून करिअरच्या दृष्टीने पाऊल टाकणे खूप आवश्‍यक आहे. सर्व यशाची शिखरे पार पाडून मोठ्या हुद्यावर काम कराल त्यावेळी फक्त गरीब लोकांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या आयुष्यातील थोडे तरी योगदान द्यावे, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

दहावीतील गुणवंतांना उदयनराजे म्हणाले...

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या टप्प्यावर तुम्ही सर्व लहान मित्रांनी भविष्यातील नवीन संधी आणि आपल्यातील वेगळेपण या गोष्टींचा विचार करून करिअरच्या दृष्टीने पाऊल टाकणे खूप आवश्‍यक आहे. सर्व यशाची शिखरे पार पाडून मोठ्या हुद्यावर काम कराल त्यावेळी फक्त गरीब लोकांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या आयुष्यातील थोडे तरी योगदान द्यावे, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

दहावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव येथील जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार भोसले यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी सभापती सुनील काटकर, शिरीष चिटणीस, गोलू साळुंखे, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक उपस्थित होते. श्री. भोसले म्हणाले, 'आगामी काळात खूप खडतर परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. यासाठी नेहमी आपल्या आई-वडील, थोरामोठ्यांसह शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या शरीराची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे.
 

व्यायाम आणि योगाच्या माध्यमातून आपले शरीर सुदृढ व सशक्त बनवा. बुद्धी चातुर्यासोबत निरोगी शरीर असणे हे आजच्या घडीला खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही अर्धी लढाई जिंकलीत, दहावीचे वर्ष हा आयुष्याची दिशा ठरवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यंदा संपूर्ण जग एका अनाकलनीय शत्रूशी लढताना अनिश्‍चित वातावरणात तुम्ही हा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्यातील गुणांचं व चिकाटीचं भविष्यात चीज व्हावं, हीच तुम्हाला शुभेच्छा आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top