esakal | पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघात ठिकाणांची सुधारणा करा : खासदार पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

MP Shrinivas Patil)

पुणे-बंगळूर महामार्गावरील अडचणी जाणून घेण्यासह त्या सोडविण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत थेट पाहणी केली.

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघात ठिकाणांची सुधारणा करा

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) अडचणी जाणून घेण्यासह त्या सोडविण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत थेट पाहणी केली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटसहित विविध ठिकाणी भेट देऊन कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय त्याची दुरुस्ती, बदलाच्याही जागीच सूचना दिल्या. राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील, महादेव चौगुले, डी. डी. बारवकर, रानोज कुमार मलिक, सुधाकर कुंभोज, संजय दातार, हंबीरराव जाधव, गोपाळराव येळवे, नरेंद्र सांळुखे, अॅड. प्रमोद पुजारी, अजित जाधव, सारंग पाटील उपस्थित होते. (MP Shrinivas Patil Inspected The Black Spot On Pune-Bangalore Highway Satara Marathi News)

लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी स्पॉट व्हिजिट केली. शेंद्रे, सातारा ते कागल महामार्गावरील (Satara to Kagal Highway) समस्यांबाबत खासदार पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या (National Highways Authority) अधिकाऱ्याची येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी बैठक घेतली. त्यानंतर थेट स्पॉट व्हिजिट ठरल्या. त्यानुसार खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महामार्गाची पाहणी केली. त्यात शिवडे फाटा, उंब्रज, इंदोली फाटा येथे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी कामातील त्रुटी व कराव्या लागणाऱ्या उपायांसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. खासदार पाटील यांनी शिवडे फाटा येथे नियोजित उड्डाणपुलाच्या जागेची, उंब्रज येथील एस आकाराच्या धोकादायक वळणाची आणि इंदोली फाटा येथील नियोजित उड्डाणपुलांची पाहणी केली. तत्पूर्वी विश्रामगृहात बैठक झाली.

हेही वाचा: 'ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा'

MP Shrinivas Patil

MP Shrinivas Patil

त्या वेळी खासदार पाटील म्हणाले, ‘‘शेंद्रे ते कागल सहापदरीकरणात येणारे उड्डाणपूल व भुयारी मार्गावर रात्री प्रकाशाची व्यवस्था कराव्यात. मार्गावरील अपघात ठिकाणांची सुधारणा कराव्यात. सेवा रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती करावी. पावसाळ्यात सेवा रस्ते पाण्याखाली जात असल्याने त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. उड्डाणपुलाखाली कचरा टाकला जात असल्याने नाले तुंबले जात आहेत. त्यामुळे तेथे दुर्गंधी आहे. तेथील स्वच्छता करावी.’’ महामार्गकडेच्या शेतात साचणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर योग्य त्या उपाययोजना करा. अपघात प्रवण क्षेत्रातील वळणे काढावीत. सहापदरीकरणात संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला देण्याची कार्यवाही करावी यासह अन्य सूचना त्यांनी केल्या.

MP Shrinivas Patil Inspected The Black Spot On Pune-Bangalore Highway Satara Marathi News

loading image
go to top