'कृष्णा'त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adv. Udaysingh Patil-Undalkar

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु होत्या.

'कृष्णा'त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर

कऱ्हाड (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) निवडणुकीत युवा नेते अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv. Udaysingh Patil-Undalkar) यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. अॅड. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संस्थापक पॅनेलची (Founder Panel) ताकद वाढणार आहे. कालच मंत्री विश्वजीत कदम यांनीही इस्लामपुरात आपली भूमिका जाहीर केली होती. (Adv. Udaysingh Patil-Undalkar Support To The Founding Panel In The Krishna Factory Election Satara Political News)

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Krishna Sugar Factory Election) अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु होत्या. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan Group), अॅड. पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रयत्नही केले. मात्र, दोन्ही नेत्यांचे एकमत झाले नाही. त्यामुळे उंडाळकर गटाचा (Undalkar Group) पर्यायाने कॉंग्रेसचा पाठिंबा कोणाला द्यायचा यासाठी युवानेते अॅड. पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षाचे (Congress party) पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक झाली. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.

सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर अॅड. पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवू, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे अॅड. पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थंकासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. पाठिंब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.

काकांच्या पश्चात पहिलीच निवडणूक

माजी सहकार मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर (Vilasrao Patil-Undalkar) यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. त्यांनी अविनाश मोहिते यांना पाठिंबा दिला हे. त्यामुळे संस्थापक पॅनेलची ताकद वाढणार आहे.

Adv. Udaysingh Patil-Undalkar Support To The Founding Panel In The Krishna Factory Election Satara Political News