esakal | ...अखेर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी; खासदार पाटलांचा पाठपुरावा
sakal

बोलून बातमी शोधा

shrinivas patil

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने त्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

...अखेर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी; खासदार पाटलांचा पाठपुरावा

sakal_logo
By
गजानन गिरी -सकाळ वृत्तसेवा

मसूर (सातारा): पुणे- मिरज- लोंढा या रेल्वे दुहेरी करणाच्या इलेक्ट्रिकल लाइनच्या कामासाठी खराडेतील शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीची मोजणी पूर्ण होऊन भूसंपादन झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने त्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

खराडेतील शेतकऱ्यांनी जोपर्यंत भूसंपादन होत नाही, तोपर्यंत कोणतेही इलेक्ट्रिक लाइनचे काम करू न देण्याचा इशारा देत आक्रमक पवित्रा घेत पुणे- मिरज- लोंढा या रेल्वे दुहेरीकरणाच्या इलेक्ट्रिकल लाइनचे काम बंद पाडले होते. शेतकरी व रेल्वे विभागामार्फत काम करणारे पावर ग्रिड कॉर्पोरेशन अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. या वेळी रेल्वे पोलिस व उंब्रज पोलिसांनी समन्वय साधत शेतकऱ्यांना शांत करत शेतकऱ्यांची बाजू वरिष्ठांपर्यंत पोचवली. रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांनी रेल्वे अधिकारी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे अधिकारी व रेल्वे पोलिसांना धारेवर धरले व रेकॉर्डचा विषय हाताळण्याची जोरदार मागणी केली.

हेही वाचा: सातारा : काडोलीजवळ गाईंचा टेंपो ताब्यात; पाटणमधील तिघांवर गुन्हा

प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांच्या सहकार्याने तारगावचे विकास थोरात यांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांवरील अन्याय टाळला. खासदार पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, रेल्वे अधिकारी, नगररचनाकार, तहसीलदार व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर मोजणी झाली. त्या वेळी विकास थोरात, रेल्वे अधिकारी बलवंत कुमार सिंग, मोजणी अधिकारी धसाडे, तलाठी, जयसिंग जाधव, अविनाश जाधव, हणमंतराव जाधव, प्रकाश जाधव व प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

पूर्वी आणि सद्यःस्थितीतील रेल्वे लाइनला संपादित होणारे सर्व गट समाविष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांना शासकीय हद्दीतून शेतमाल नियमन करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. खराडे गावच्या शेतकऱ्यांनी खासदार पाटील यांच्यासह सारंग पाटील, विकास थोरात यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद दिले.

loading image
go to top