Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी

Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी
Updated on

क-हाड : राज्यातील काेराेनाच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात विकेंड लॉकडाउन जाहीर केले आहे. शनिवारपासून (ता.10) त्याची अंमलबजावणी सुरु झाली. दाेन दिवस आवश्यकता असल्यास घरा बाहेर पडा अशी सक्त सूचना असल्याने नागरिक त्याचे तंताेत पालन करताना दिसून आले. आम्ही वीकेंड लाॅकडाउनच्या कव्हेरज करीत हाेताे. बहुतांश तालुक्यांमध्ये सामसुम हाेते. रस्त्यांवरील चाैकात पाेलिस त्यांची कामगिरी बजावत हाेते. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (shriniwas patil) यांना भेटण्याची आज इच्छा झाली. त्यांच्याकडे गेलाे तर पाहताे काय खासदारांनी पुढारी पोशाख बाजुला ठेवुन टी-शर्ट, साधी पँट घालत गहु काढणीवर भर दिला हाेता. 

मी, दिनकर थोरात, सुहास पाटील असे तिघेजण हाेताे. गोठे येथील निवासस्थानी जाताच गेटवर वाॅचमनने सांगितले गहू काढायचे चालले. आम्ही पुढं गेलो तर निवासस्थाना पाठीमागच्या शेतात साहेब डोक्याला टापर गुंडाळून वाकून गहू काढत होते. आम्हाला पाहिलं की नेहमीच्या शैलीत ' राम राम ' अस स्वागत केलं, तरी पण खाली वाकून दोन - तीन पेंडया काढल्याच. वयाच्या 81 व्या वर्षीचा साहेबांचा उत्साह पाहून थक्क झालो. साहेबांनी त्यांचं आटोपलं आणि माहिती द्यायला लागले. यावर्षी या शेतात भात केला होता. भात काढल्यानंतर शेतात पाणी साठवून होतं म्हणून खपली गहू टोकायला उशीर झाला. आता चांगला गहू आलाय. जेवढं आपल्याला लागेल तेवढं ठेवायचं अन बाकीच वाटून टाकायचं. शेजारी असलेली वांगी, टोमॅटोची भाजी आणि कलिंगड ही पूर्ण सेंद्रिय आहेत. तोपर्यंत कुणाला तरी हाक दिली कलिंगड कापून आण रे....
 

खासदार श्रीनिवास पाटील या माणसाची अनेक रूपं महाराष्ट्रान बघितलीत त्यापैकी हे एक रूपं, साहेब प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, खासदार, राज्यपाल अशा प्रत्येक पदांवर असताना इतिहासात नोंद होईल असं काम केलं. खासदार म्हणून एकीकडं अस्सलिखित इंग्रजीत भाषण करून संसदेतील सर्वांचं लक्ष वेधून घेतात तर मतदार संघात असले की कुठल्यातरी वाड्या पाड्या वरच्या भाबड्या माणसाला त्याच्याच भाषेत गप्पा मारतात. आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची त्यांची धडपड सुरू असते. कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला की काम होणार हे ही त्याना पक्कं माहीत असत. 

यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेली व्यक्तिमत्त्व आता दुर्मीळ झालेत. यशवंतरावांचा सहवास पाटील साहेबांना लाभला. यशवंतरावांना वाटायचं अधिकाऱ्याला हो म्हणता आलं पाहिजे आणि राज्यकर्त्याला नाही म्हणता यायला पाहिजे. पाटील साहेब यशवंतरावांच्या स्वप्नातले अधिकारी झाले आणि राज्यकर्ते ही झाले. इतकी विविध रूपं असणारा, इतका व्यासंग असणारा, इतकं साधं राहणारा राज्यकर्ता महाराष्ट्रात दुसरा नाही हे नक्की ....

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या काेराेनावरील वक्तव्याचा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला समाचार, काय म्हणाले राजे वाचा सविस्तर
 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com