कोल्हापूर, अहमदाबाद, बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस गाड्यांना साताऱ्यात 'थांबा' आवश्यक : खासदार पाटील

हेमंत पवार
Saturday, 31 October 2020

रेल्वेसंदर्भात झालेल्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती नोंदवत खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील काही ठळक मुद्दे मांडून विविध कामांची मागणी केली. अन्य खासदारांसह मुंबई, पुणे व सोलापूर येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली.

कऱ्हाड (जि. सातारा) : रेल्वे कामासाठी केलेल्या जिल्ह्यातील भूसंपादनाबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. भूसंपादन रेकॉर्ड अद्ययावत करताना उपलब्ध असलेल्या नकाशांची खात्री राज्याच्या संबंधित महसूल विभागामार्फत करून भूसंपादनाच्या तक्रारींचा निपटारा करावा, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली. 

रेल्वेसंदर्भात झालेल्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती नोंदवत खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील काही ठळक मुद्दे मांडून विविध कामांची मागणी केली. अन्य खासदारांसह मुंबई, पुणे व सोलापूर येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली. सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य देखावे व शिल्पचित्राच्या माध्यमांतून दाखवण्यात यावे. 

ढेबेवाडी-पाटण प्रवास..घोडं खाईना भाडं; बस स्थानकात सन्नाटा

लोणंद येथे अंडरपास मंजूर करण्यासाठी प्रस्ताव करावा, लोणंद रेल्वे जंक्‍शनवर हायमास्ट लॅम्प बसवावे, जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा उपलब्ध व्हावी, अशा सूचना करून कोल्हापूर, अहमदाबाद आणि बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस या प्रवासी गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यातील काही स्टेशनवर थांबा मंजूर करण्याची मागणी खासदार पाटील यांनी या बैठकीत केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Srinivas Patil Interacts With Officials Video Conference Regarding Railways Satara News