'सातारकर सोबत आहेत ना.. मग बस्स! मला आणखी कोणाची गरज नाही'

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

सातारा : सातारा विकास आघाडीच्‍या (Satara vikas aghadi) माध्‍यमातून जनतेला दिलेली वचने मी पूर्ण केली असून साताऱ्याच्‍या विकासासाठी कोणी सोबत असो वा नसो. सातारकर माझ्‍यासोबत आहेत ना, मग बस्स!, असे वक्‍तव्‍य आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केले. याचवेळी त्‍यांनी विकासासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना (MLA Shivendrasinharaje Bhosale) सोबत घेण्‍याच्‍या प्रश्‍‍नाला बगल दिली. हा प्रश्‍‍न दुर्लक्षित करत उदयनराजेंनी मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली.

Summary

निवडणुकीनंतर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंमधील अंतर जास्‍तच वाढत गेले आहे.

सातारा शहरातील विविध विकासकामांना येथे खासदार उदयनराजेंच्‍या हस्‍ते प्रारंभ झाला. यापूर्वी त्‍यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी नगराध्‍यक्षा माधवी कदम, उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ॲड. दत्ता बनकर तसेच ‘साविआ’चे नगरसेवक व पदाधिकारी उपस्‍थित होते. सातारा पालिकेची निवडणूक आणि मनोमीलन हा विषय नेहमीच जिल्‍ह्‍यात आणि राज्‍यात चर्चेचा विषय असतो. गत निवडणुकीवेळी मनोमिलन मोडत उदयनराजेंनी थेट नगराध्‍यक्षपदाच्या निवडणुकीसह इतर जागांवर वर्चस्‍व मिळवत पालिकेची सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीनंतर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंमधील अंतर जास्‍तच वाढत गेले आणि त्‍याचा भडका आनेवाडी टोलनाक्‍याचे व्‍यवस्‍थापन ताब्‍यात घेण्‍याच्‍या कारणावरून सुरुचीसमोरील राड्यात उडाला. गोळीबार, जीवे मारण्‍याच्‍या प्रयत्‍नामुळे हा राडा राज्‍यभरात गाजला.

Udayanraje Bhosale
Banner War : साताऱ्यात श्रेयवादावरून दोन राजे आमने-सामने

कार्यकाळातील पाच वर्षे पूर्ण होत आल्‍याने सातारा पालिकेच्‍या निवडणुकीचे पडघम वाजण्‍यास सुरुवात झाली असू्न उदयनराजेंनी ‘साविआ’च्‍या माध्‍यमातून विकासकामांचा धडाका उडवून दिला आहे. याच अनुषंगाने पोवई नाका ते वाढे फाटा या रस्‍त्‍याच्‍या रुंदीकरणाच्‍या कामास त्‍यांनी आज सुरुवात केली. यावेळी त्‍यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. ‘आम्‍ही दिलेले शब्‍द, वचन पाळतो. मात्र, दुसरीकडे आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वर्षे लागतात, असा टोला त्‍यांनी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला. याच अनुषंगाने विकासासाठी शिवेंद्रसिंहराजे हे तुमच्‍यासोबत इतर ठिकाणी तसेच सातारा पालिकेत सोबत असतील का, असा प्रश्‍‍न त्‍यांना विचारण्‍यात आला. ‘कोणी सोबत असो वा नसो. सातारकर माझ्‍यासोबत आहेत ना, मग बस्स!, असे वक्‍तव्‍य उदयनराजे यांनी करत निवडणुकीच्‍या तोंडावर साताऱ्यात सुरू असणाऱ्या उघड, छुपे, अंतर्गत मनोमिलनाच्‍या चर्चांना पूर्णविराम दिला. या कार्यक्रमानंतर त्‍यांच्या हस्‍ते करंजे येथे उभारण्‍यात येणाऱ्या बागेच्‍या कामाचे भूमिपूजन झाले.

Udayanraje Bhosale
कर्करोगाला हरवून मैदानावर जबरदस्त पुनरागमन

आम्‍ही दिलेले शब्‍द, वचन पाळतो. मात्र, दुसरीकडे आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वर्षे लागतात.

-उदयनराजे भोसले, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com