स्टाईल इज स्टाईल! कार्यकर्त्याची इच्छा पुरी, उदयनराजेंची बाईक सवारी!

बाळकृष्ण मधाळे
Friday, 23 October 2020

उदयनराजे कुठेही गेली तरी तरुणाईचा त्यांच्यासमोर गराडा असतोच असतो. कधी सेल्फी घेण्यासाठी, तर कधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. राजेंचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांच्या हटके अंदाजासाठी त्यांना तरुणाई सोशल मीडियावर फाॅलो करत असते. सध्या समाज माध्यमांत उदयनराजेंची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे.

सातारा : खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज तरुणाईला नेहमीच भुरळ पाडत असतो. उदयनराजे कुठेही गेली तरी तरुणाईचा त्यांच्यासमोर गराडा असतोच असतो. कधी सेल्फी घेण्यासाठी, तर कधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. राजेंचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांच्या हटके अंदाजासाठी त्यांना तरुणाई सोशल मीडियावर फाॅलो करत असतात. सध्या समाज माध्यमांत उदयनराजेंची मोठी क्रेझ पहायला मिळत असून व्हाॅटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर या सारख्या माध्यमांत उदयनराजेंचा फाॅलोवर्स अधिक आहे.

उदयनराजेंना बाईक सवारी करणे अधिक पसंत असून त्यांनी वेळोवेळी याची प्रचिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजेंची बुलेट सवारी करत आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. याची समाज माध्यमांवर खूपच चर्चा झाली. उदयनराजेंच्या गाडीचा 007 हा नंबर तर तरुणाच्या मनामनांत पहाला मिळत असून अनेकांनी आपल्या गाडीवरती हा क्रमांक उतरवून, एकच साहेब महाराज साहेब अशा प्रकारचे स्लोगन बनवले आहेत. खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

यात उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. राजघराण्यातील उदयनराजेंची जशी क्रेझ आहे, तसंच काहीसं उदयनराजेंनी बाईक रायडिंगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (ता. 22 ) घडले.

राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला 'खडसावले'

उदयनराजे गुरुवारी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तर सोडवत होते. त्यावेळी एक कार्यकर्ता जलमंदिर पॅलेस येथे त्याची स्वत:ची नवी गाडी घेऊन जलमंदिर पॅलेस येथे आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिर पॅलेसपासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड मारले. पण, हे राऊंड काही साधे नव्हते. राजे खुश असल्यामुळे त्यांच्या गाडीने केव्हा शंभरच्या पुढ वेग गाठला समजलेच नाही. मात्र, उदयनराजेंच्या या हटके अंदाजाला अनेकांनी दाद देत हा अंदाज सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे समाज माध्यमांत उदयनराजेंची किती क्रेझ आहे, याचा अंदाज नक्कीच आला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Bike Ride In Jalmandir Palace Satara News