esakal | हिंमत असेल तर ED नं माझ्याकडं यावं, पुराव्यासकट यादी देईन : उदयनराजे I Udayanraje Bhosale
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale
केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात आहे.

हिंमत असेल तर ED नं माझ्याकडं यावं, पुराव्यासकट यादी देईन : उदयनराजे

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

किल्ले प्रतापगड (महाबळेश्वर) : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आज (गुरुवार) त्यांनी किल्ले प्रतापगडावर (Fort Pratapgad) भवानी मातेचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. तसेच त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय. शिवाय, त्यांनी ईडीच्या (ED) कारवाईबाबत मोठं विधान केलंय.

उदयनराजे म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही (Assembly Election) पूर्वीपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केलाय. यात अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग, सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, भाजपाकडून हा आरोप सातत्याने फेटाळला जात आहे. मात्र, आज खुद्द भाजपाचे खासदार उदयनराजे यांनी यावर भाष्य करताना म्हटलंय, की ईडीनं हिंमत असेल, तर आपल्याकडे यावं, असा जणू इशाराच त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलाय, ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

हेही वाचा: मी चालत फिरीन नाहीतर लोळत फिरीन, तुम्हाला त्याचं काय?

तसेच त्यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाजपालाही घरचा आहेर दिलाय. 'जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही.. ज्यांनी वाईट केलंय, त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल, तर ईडीनं माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, अशा स्पष्ट शब्दात उदयनराजेंनी ईडीलाही सुनावलंय. तद्नंतर त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल, तर तुम्हीपण तसं करा, असंही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: कर्नाटकच्या राजकारणात भूकंप; काँग्रेस-जेडीएस युती संपुष्टात

loading image
go to top