
लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करा; खासदार उदयनराजेंचा आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव
सातारा : केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, जिल्ह्याच्या, तसेच सातारा शहराच्या लोकसंख्येचा विचार करत त्यासाठी आवश्यक असणारी लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी करणारा प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयास पाठवला आहे. यात त्यांनी शहर, तसेच गावपातळीवर केंद्रे स्थापण्याची मागणी केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या लसीकरण सुरू असून, आजअखेर कोरोनाशी पहिल्या फळीत लढणाऱ्या आणि ज्येष्ठांना लस देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असतानाच आता शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. यानुसार जिल्हा, शहर आणि गावपातळीवरील लोकसंख्येचा विचार करत स्थानिक पातळीवर लसीकरण केंद्रे होणे आवश्यक आहे.
यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायतीत नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्रे सुरू होणे आवश्यक आहे. यामुळेच आपण त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयास दिला आहे. साताऱ्यात सध्या दोन लसीकरण केंद्रे असून, लवकरच इतर मध्यवर्ती भागात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे दिली. या केंद्रांमुळे नागरिकांना लस घेणे सोयीचे होईल, असा विश्वासही त्यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.
Edited By : Balkrishna Madhale
Web Title: Mp Udayanraje Bhosale Demands To Start Vaccination Center Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..