esakal | Maratha Reservation : उदयनराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation : उदयनराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

खासदार उदयनराजे भोसले यांनी बांधकाम व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी सातारा शहर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न, नियोजित विकासकामे यासंदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. 

Maratha Reservation : उदयनराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शनिवारी सायंकाळी मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay)  यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी श्री. ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. मराठा आरक्षण व राज्यातील राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली.  

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदार उदयनराजे भोसले यांनी दिग्गज नेत्यांना भेटण्याचा व त्यांना राजमुद्रा भेट देण्याचा सपाटा लावला आहे. शनिवारी त्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट दिली. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ""आज आमची कोणतीही पक्षीय पातळीवरील किंवा राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, मराठा आरक्षणावर चर्चा केली. यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये, असं त्यांना सांगितलं होतं. कोणाच्या आरक्षणावर गदाही येऊ नये. इतर समाजातील लोकांना जसा न्याय मिळाला. तसा मराठा समाजातील लोकांनाही भेटायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा, नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.''
 
आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगानेही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उदयनराजेंनी श्री. ठाकरे यांना मामाच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनीही उदयनराजेंचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी उदयनराजेंसमवेत जितेंद्र खानविलकर, काकासाहेब धुमाळ उपस्थित होते. 

एकनाथ शिंदेंशीही चर्चा 

खासदार उदयनराजे भोसले यांनी बांधकाम व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी सातारा शहर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न, नियोजित विकासकामे यासंदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. 

मैदानावर अन्‌ मैदानाबाहेरही परिस्थितीशी दोन हात करत बाळू वाढवतोय देशाचा नावलौकिक

Shimla Narkanda Tour : जर तुम्ही शिमलाला गेलात, तर नारकंडाला नक्की भेट द्या; जाणून घ्या शहराची वैशिष्ट्ये..

दमण आणि दीवची ही सुंदर ठिकाणं मन प्रफुल्लीत करुन सोडतील; मग वाट कसली बघताय?

सातारकरांनाे! कास जलवाहिनीस लागली गळती; पाणी काटकसरीने वापरा

Edited By : Siddharth Latkar