Satara News : शेतीपंपाच्या बिलांचा घोळात घोळ; विंग परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी; मीटर रीडिंगप्रमाणे करावी आकारणी

महावितरणने नुकत्याच अदा केलेल्या शेतीपंपाच्या बिलावर सावळा गोंधळ येथे दिसून येत आहे
msedcl agri water pump bills scam farmers satara charging should be done as per meter reading
msedcl agri water pump bills scam farmers satara charging should be done as per meter readingSakal

विंग : महावितरणने नुकत्याच अदा केलेल्या शेतीपंपाच्या बिलावर सावळा गोंधळ येथे दिसून येत आहे. अश्‍वशक्ती व रीडिंगप्रमाणे बिले आकारली आहेत. अश्‍वशक्तीची बिले वाढीव आहेत. यंदा पाऊस कमी आहे. गेले काही महिने विहिरीत पाणीसाठा कमी असताना बिले वाढवून कशी आली? अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. त्यामुळे संभ्रमवस्था आहे. वाढीव वीजबिलामुळे आर्थिक भुर्दंड कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

महावितरणने शेतीपंपाची नुकतीच बिले दिली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती ती आली आहेत. दर तीन महिन्यांला बिले आकारून येतात. येथील वीज उपकेंद्रातून विंगसह येरवळे, चचेगाव, शिंदेवाडी परिसरातील खासगी विहिरी आणि बोअरवेलला वीजपुरठा होतो. वाढीव वीजबिलाचा झटका सर्वसामान्य ग्राहकांना नित्याचाच बनला आहे.

बिलावरील आकड्यातील त्रुटीमुळे आताच आलेल्या बिलावर सावळा गोंधळ दिसून येत आहे. संभ्रम निर्माण करणारा आहे. काहींना अश्‍वशक्ती तर काहींना रीडिंगप्रमाणे बिल आकारली आहेत. येथील घोरपडे पाणंद, तसेच हॅाटेल ते शिंदेवाडी फाटा दरम्यान परिसरात शेतीपंपाची बिले अश्‍वशक्तीप्रमाणे आकारली आहेत.

ग्राहकांना आर्थिक भुर्दंड त्यामुळे बसला आहे. बिलावर वाढ झाली आहे. कसलेही रीडिंग त्यावर नाही. अंदाजे बिले आकारली आहेत. असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तीन एचपीच्या पंपाला यापूर्वी १२०० ते १३०० बिल येत होते. मात्र, तेच बिल दोन हजारांवर गेले आहे. रीडिंगप्रमाणे बिले आकारून मिळावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

घोरपडे पाणंद ते शिंदेफाटा दरम्यान परिसरात अश्‍वशक्तीप्रमाणे बिले आली आहेत. बिलात १४ फेब्रुवारीला १२६० त्यानंतर ११ मे रोजी १८२०, १ नोव्हेंबरला ४२५० आकारले आहे. अन्य परिसरात रीडिंगच्या बिलाचा आकार कमी आहे. त्यामुळे रीडिंगप्रमाणे बिले आकारून मिळावीत.

- भीमराव घोरपडे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com