

UPI Ticketing Brings Relief from Loose Change Issues in ST Buses
Sakal
सातारा : एसटीने प्रवास करताना वारंवार प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडायचे. अनेकदा या वादाचे कारण असायचे तिकिटासाठी मागितलेले सुटे पैसे. मात्र, गेल्या काही महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासात डिजिटल व्यवहारांना सुरुवात झाल्याने प्रवाशांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याने वादावादीच्या प्रसंगांनाही ब्रेक लागताना दिसत आहे.