

MSRTC Introduces AI Monitoring System to Control Fuel Leakage in Buses
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : एसटीच्या इंधन गळतीमुळे दर १०० लिटरमागे चार ते पाच लिटरची तूट होत आहे. या गळतीतून महामंडळाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. तो रोखण्यासाठी तसेच इंधन भरण्यातील अनियमितता टाळण्यासाठी एसटीच्या प्रत्येक पंपावर इंधन टाकी व नोझलला एआय आधारित सेन्सर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तूट भरून निघून त्यातील सत्यता समोर येण्यास मदत होणार आहे.