Satara ST : एसटीच्या ताफ्यात आणखी ७० बस; २० इलेक्ट्रिकल, ५० लालपरीचा समावेश

राज्यभरात विविध डेपोंना ई-बस दिल्या जात आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने सातारा विभागात ई-बस दाखल ताफ्यात दाखल होत आहेत. मागील महिनाभरात एकूण २० ई-बस मिळाल्या आहेत. वाढत्या बसच्या संख्येमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
MSRTC expands its fleet with 70 new buses, including 20 electric and 50 red buses, to enhance public transport services in Maharashtra."
MSRTC expands its fleet with 70 new buses, including 20 electric and 50 red buses, to enhance public transport services in Maharashtra."Sakal
Updated on

सातारा : प्रदूषणमुक्त प्रवासासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध डेपोंमध्ये पर्यावरणपूरक २० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बसमुळे प्रदूषण कमी होणार असून, प्रवाशांना आरामदायी व वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. याचबरोबर गेल्या आठवडाभरात ५० लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, पाच डेपोंना दहा बस देण्यात आल्या आहेत. वाढत्या बसच्या संख्येमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com