"एल्गार' नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"एल्गार' नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे पैसे

एसटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी राज्य सरकारने एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, दोन महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी जमा होणार का नाही, असा प्रश्‍न काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर नोव्हेंबर व पुढील प्रत्येक महिन्याचे वेतन वेळेवर जमा होणार का? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

"एल्गार' नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे पैसे

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्यभरात आक्रोश आंदोलनाचा एल्गार केल्यानंतर महामंडळाने ऑगस्ट महिन्याचे वेतन एसटीच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसह सातारा विभागातील चार हजार 200 कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.
 
कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाउनमुळे एसटीची बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जवळपास सहा महिने सेवा ठप्प असल्याने या काळात अनेकांना 50 टक्केही वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांपुढे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून राज्यभरात तीन ते चार वेळा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आले नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयासही आंदोलन सुरू केल्यानंतर महामंडळाला जाग येऊन एक महिन्याने वेतन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

माणदेशी युवकांना हवीय राष्ट्रवादीत झोकून काम करण्याची संधी; मुलाखती सुरु
 
ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या तोंडावर आंदोलन केल्यानंतर एक महिन्याचे वेतन मिळाले आहे. आमच्या हक्काचे पैसे आंदोलन करून मिळवायची वेळ आली आहे. याचबरोबर अजून दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन दिवाळीपूर्वी जमा करावे,'' अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

पुढील महिन्याचे वेतन वेळवर होणार का? 

एसटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी राज्य सरकारने एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, दोन महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी जमा होणार का नाही, असा प्रश्‍न काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर नोव्हेंबर व पुढील प्रत्येक महिन्याचे वेतन वेळेवर जमा होणार का? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top