पर्यटन बहरणार.. एमटीडीसीची महाबळेश्‍वर, कोयनानगरात लगबग सुरु

पर्यटन बहरणार.. एमटीडीसीची महाबळेश्‍वर, कोयनानगरात लगबग सुरु

सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला "ब्रेक' बसला होता. पण, आता हॉटेल्स, रिसॉर्टस सुरू करण्याची परवानगी मिळालेली असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जिल्ह्यातील कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्टस महिभरात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व रूम्स, किचनचे सॅनिटायझेशनचे काम युध्दपातळीवर केले जाणार आहे. आतापर्यंत लोणावळा, माळशेज, माथेरान येथील रिसॉर्ट सुरू झाली आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात कोयनानगर व महाळेश्‍वर येथील रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत रूजू होतील, असे पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे पर्यटन विकास थांबला होता. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, निवासी रिसॉर्टस बंद होती. सातारा जिल्ह्यात महाबळेश्‍वर, पाचगणी तसेच सातारा शहर परिसरात असलेले कास पठार, ठोसेघर धबधबा येथील पर्यटन पूर्णपणे बंद होते. महाबळेश्‍वरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करून या तालुक्‍यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत होते. सप्टेंबरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्याने साताऱ्याने कोरोनाबाबतचे सर्व उच्चांक मोडले. आता सातारा, कऱ्हाड तालुका वगळात उर्वरित तालुक्‍यांत कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसू लागलेली आहे. महाबळेश्‍वरमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पूर्णपणे कमी झाली आहे, अशा ठिकाणचे रिसॉर्ट सुरू करण्यास सुरवात केली आहे.

Video : आजीनं साद घातली अन् पोलिस अधीक्षक गहिवरल्या!

पर्यटन विकास महामंडळाची भीमाशंकर, माळशेज, लोणावळा, माथेरान, महाबळेश्‍वर आणि कोयनानगर येथे रिसॉर्टस आहेत. बहुतांशी वेळा थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल्समध्ये राहणे सर्वसामान्यांना परवडत नाही. अशा वेळी पर्यटनासाठी अशा स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचा आधार असतो. आता कोरोनामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे. पण, लॉकडाउन पूर्णपणे उठविण्यात आले असल्याने पुन्हा एकदा पर्यटनाला चालना मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासातून सुमारे 100 ते 125 कोटींची उलाढाल होते. यावर्षी मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे पर्यटन पूर्ण बंद होते. त्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना बसला आहे. आता अनलॉक होत असताना पुन्हा एकदा पर्यटनस्थळांवर पर्यटन बहरणार आहे. आता महाबळेश्‍वर व कोयनानगर येथील पर्यटन हळूहळू मार्गी लागणार आहे. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने तयारी सुरू केलेली आहे. कोरोनाकाळात महाबळेश्‍वरातील रिसॉर्टमध्ये कोविड सेंटर केले होते. आजही तेथे काही रुग्ण उपचार घेत आहेत. महाबळेश्‍वरातील रुग्णसंख्या पूर्ण कमी झाल्यावर साधारण महिनाभरात हे रिसॉर्ट पूर्ण सुरू केले जाणार आहे. 

एवढा विश्वास नाही का ? मग कशाला घेतला मला मोबाईल ? माझा जुनाच बरा होता. मोबाईल वरून त्यांच्यात सारखी भांडण होऊ लागले अन अखेर...

...अशा करणार उपाययोजना 

सुरू करण्यापूर्वी सर्व रिसॉर्टचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑक्‍सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, सॅनिटायझर, पर्यटकांचा ट्रॅव्हल इतिहास, कोरोना निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेट घेतले जाणार आहे. तसेच येथे डॉक्‍टरची सुविधा उपलब्ध केली जाणार असून, एखाद्या पर्यटकाला तातडीने उपचाराची आवश्‍यकता भासल्यास त्याची सुविधाही केली जाणार आहे. रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्यांना सुरक्षिततेची सर्व साधने उपलब्ध केली जाणार आहेत. तसेच रिसॉर्टमधील कॅन्टीनमध्येही सॅनिटायझेशन करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. साधारण महिनाभरात एमटीडीसीची कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्ट सुरू करण्याचा मानस दीपक हार्णे यांनी व्यक्त केला आहे.

जगात निर्मळ प्रेम आहे, फक्त ते जाणता आलं पाहिजे! 


सर्वसामान्यांना परवडणारे भाडे... 

पर्यटन विकास महामंडळाचे महाबळेश्‍वरातील रिसॉर्टमध्ये 120 रूम्स आहेत. तर कोयनानगर येथील रिसॉर्टमध्ये 22 रूम्स आहेत. महाबळेश्‍वरच्या रिसॉर्टमध्ये एसी, नॉनएसी, सर्वसाधारण असे रूम असून, त्यांचे भाडेही 1200 ते 3500 रुपयांपर्यंत आहे. हे भाडे येथे येणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना परवडणारे आहे.

दहा आंतरजातीय जाेडप्यांना ग्रामस्थांनी स्वीकारले

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com