म्युकरमायकोसिसचे 21 संशयित रुग्ण आढळले; यंत्रणा सतर्क

कोविड बरा झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. या रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Mucormycosis
Mucormycosisesakal

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संकट (corona pandemic) असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या नव्या प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. यापूर्वी जिल्ह्यात 17 संशयित सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. आता नव्याने आणखी चार संशयितांची भर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (mucormycosis patients increased satara marathi news)

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. बाधित आणि मृत्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना आता नव्या आजाराने रुग्ण हैराण झाले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोळ्यांना, नाकाला सूज येणे, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. आजार वाढल्यास मेंदूपर्यंत जाऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. म्युकरमायकोसिस आजाराने खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय व काही रुग्णांवर पुण्यातही उपचार सुरू आहेत. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. या रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Mucormycosis
Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!

म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना औषधोपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्‍शन व इतर वैद्यकीय उपचारांचा तुटवडा असल्याने रुग्णांना पुणे अथवा मुंबईला हलविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिससाठी आवश्‍यक उपचारासाठीची औषधे उपलब्ध करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 17 संशयित रुग्ण आढळले होते. आता आणखी चार संशयित रुग्ण साताऱ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असताना आता म्युकरमायकोसिसचे संशयित आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. याबाबत लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Mucormycosis
‘म्युकरमायकोसिस’वर उपचार शक्‍य; वाचा डॉ. आशीष पोडे यांचा सल्ला

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 21 संशयित रुग्ण आढळले आहेत. या प्रकारचे रुग्ण खासगी रुग्णालयात आढळल्यास आरोग्य विभागाला तातडीने माहिती द्यावी.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com