

Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
sakal
कास: पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येत असलेले मुनावळे जलपर्यटन केंद्र रविवार (दि. २७) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले झाले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले हे पर्यटन केंद्र सुरू झाल्याने राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर विविध साहसी जलक्रीडांचा थरार अनुभवता येणार आहे.