हद्दवाढीमुळे अशी हाेईल सातारा पालिकेची आगामी निवडणूक

प्रवीण जाधव
Wednesday, 9 September 2020

पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागात पालिकेला लगेच कर घेता येणार नाही. शासनाच्या नियमानुसार तेथे सुविधा पुरवाव्या लागतात. त्यानंतर पाच वर्षांत नव्या भागात टप्प्याटप्प्याने कर वाढवले जातील. शासनाची अधिसूचना आल्यानंतर हद्दवाढीत आवश्‍यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

सातारा : गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सातारकरांचा हद्दवाढीचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. साधारणपणे तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढ झालेल्या भागासह नव्याने पालिकेची निवडणूक लागू शकते; परंतु सातारा पालिकेची निवडणूक पुढील वर्षातच लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक वाढीव भागासह होण्याची शक्‍यता जाणकार व्यक्त करत आहेत.
 
सातारा शहराच्या हद्दवाढीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचा प्रतिसाद देत पवारांनी हद्दवाढीचा अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्‍न नुकताच मार्गी लावला. हद्दवाढीचे पत्र त्यांनी मंगळवारी (ता.आठ) मंत्रालयात शिवेंद्रसिंहराजेंकडे सपूर्द केले. सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे पालिकेचे क्षेत्र 8.7 चौरस किलोमीटरवरून सुमारे 12 चौरस किलोमीटर इतके होणार आहे.

सातारच्या हद्दवाढीबाबत उदयनराजेंची ही भावना; या नेत्याला दिले सर्व श्रेय!

पालिका हद्दीतील शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एक लाख 29 हजार इतकी आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान दुप्पट वाढ झालेली आहे. त्यातच वाढीव भागातील दीड ते पावणेदोन लाख लोकसंख्येची शहरामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे 2021 च्या जनगणनेमध्ये सातारा शहर साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे होणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सुविधा देण्याचे आव्हान सत्ताधारी व पालिका प्रशासनासमोर असणार आहे. नगरसेवकांची संख्या 20 पेक्षा जास्त वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाढीव भागातील अनेक इच्छुक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचे आगामी काळात पाहायला मिळणार आहे.

करंजे, गोडोलीसह काेणता भाग सातारा शहराच्या हद्दीत आला जाणून घ्या

असा झाला हद्दवाढीचा प्रवास...

 •  
 • 2 मे 1979 : सातारा पालिकेच्या हद्दवाढीचा शासनाकडे प्रस्ताव
 •  
 • 27 मे 1981 : हद्दवाढीबाबत शासनाची प्रारूप अधिसूचना 
 •  
 • 1991 : दुसऱ्यांदा प्रारूप अधिसूचना निघाली 
 •  
 • 22 नोव्हेंबर 96 : औद्योगिक वसाहत वगळून हद्दवाढीचा 
 • फेरप्रस्ताव पाठवा : शासनाच्या सूचना
 •  
 • 20 डिसेंबर 97 : हद्दवाढीचा नवा ठराव पालिका सभेत मंजूर
 •  
 • 23 डिसेंबर 99 : जिल्हाधिकाऱ्यांकडून नगरविकास विभागाकडे 
 •  
 • 19 जुलै 2001 : हद्दवाढीबाबत तिसऱ्यांदा प्रारूप अधिसूचना निघाली 
 •  
 • 15 जानेवारी 2002 : जिल्हाधिकाऱ्यांचा हरकतींवर अभिप्राय
 •  
 • 30 ऑगस्ट 2013 : सातारा पंचायत समितीचा ठरावाद्वारे हिरवा कंदील
 •  
 • ऑगस्ट 2013 : अंतिम शिफारशीसाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे गेला
 •  
 • मे 2013 : शाहूपुरी, खेड व विलासपूर ग्रामपंचायतींचा विरोधी ठराव
 •  
 • 24 डिसेंबर 15 : स्थायी समितीच्या शिफारसीसह शासनास सादर
 •  
 • 22 मार्च 2017 : साताऱ्याच्या हद्दवाढीची चौथ्यांदा अधिसूचना निघाली
 •  
 • 15 सप्टेंबर 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंतिम मान्यतेची घोषणा
 •  
  सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे
   
 • 8 सप्टेंबर 2020 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हद्दवाढीचे पत्र आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

  ..अखेर सातारच्या नगराध्यक्षांनी नगरविकासकडे मागितले मार्गदर्शन!

 

पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागात पालिकेला लगेच कर घेता येणार नाही. शासनाच्या नियमानुसार तेथे सुविधा पुरवाव्या लागतात. त्यानंतर पाच वर्षांत नव्या भागात टप्प्याटप्प्याने कर वाढवले जातील. शासनाची अधिसूचना आल्यानंतर हद्दवाढीत आवश्‍यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल.'' 

अभिजित बापट, मुख्याधिकारी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muncipal Council Election Process With Extend Borders Satara News