
सातारा : तांत्रिक बिघाडीचे कारण देत पालिका प्रशानाने शहरातील एक दिवस पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेच्या उपसा पंपाचा पुन्हा बिघाड झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी टाक्यांना पुरेशी पाणीपातळी मिळत नसल्यामुळे शहापूर, तसेच कास योजनेवरुन पाणीपुरवठा होत असलेल्या शहरातील प्रत्येक भागात एक दिवसांची पाणी कपात करण्यात आली आहे. ऐन पावसाळ्यात दुसऱ्यांदा पाणीकपात व पंधरा दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
शहापूर माध्यमातून उरमोडी उद्भव येथून २०० एचपीच्या दोनपंपाद्वारे पाणी उपसा करुन सातारा शहराच्या काही भागास पाणीपुवठा केला जातो. मात्र, २०० व ७५ एचपीचे दोन पंप नादुरुस्त झाल्याने शहापूर केंद्रावर पाणी उपसा करण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या टाक्यांना पाण्याची पुरेशी पातळी मिळत नसून परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पंप दुरुस्तीसाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात एक दिवसांची पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी कास माध्यमातील भैरोबा टाकीमधून शुक्रवार पेठ, गडकर आळी परिसर, तसेच शहापूर माध्यमातील राजवाडा टाकीवरील तांदुळआळी, मोती चौक, देवी चौक, गोरक्षण बोळ, शनी मारुती मंदिर, पिछाडी परिसर, मोती चौक ते ५०१ पाटी, औंधकर मळा, मोती चौक ते राधिका टॉकीज ते अमृता नर्सिंग होम परिसर, तसेच पंपिंग लाईनवरील टोपे मामा दत्त मंदिर ते घोरपडे कॉलनी, काकडे बोळ परिसर व जुना दवाखाना कोपरा लाईन तर गुरुवार टाकी पहिल्या झोनमध्ये कूपर कारखाना ते पिसाळ आर्केड, शाहू गार्डन पिछाडी ते तरडे घर-शिर्के हौद, पिसाळ आर्केड ओढ्यातील भाग-घोरपडे कॉलनी ते केसरकर पेठ, पार्टे घर ते सूर्यवंशी वस्ती, जुना दवाखाना परिसरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी कास माध्यमातील व्यंकटपुरा टाकीवरील व्यंकटपुरा पेठ, धननीची बाग, कारंडबी नाका परिसर, तसेच सकाळ सत्रातील पोळ वस्ती, पॉवर हाऊस झोपडपट्टी परिसर, चिमणपुरा पेठ, शहापूर माध्यमातून घोरपडे टाकी दुपार सत्रातील कुंभारवाडा, कोल्हाटी वस्ती, चार भिंती टाकी ते कूपर कारखाना अखेरच्या चार बैठ्या टाक्या घंटेवारी या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
बुधवारी कास माध्यमावरील कोटेश्वर टाकीवरुन शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका व नामदेववाडी परिसर, शहापूर माध्यमातील घोरपडे टाकीवरील सकाळ सत्रातील राजलक्ष्मी पिछाडी ते शेटे चौक परिसर, नालबंद वाडा परिसर ते खड्डा मस्जिद, कोतवालवाडा परिसर, औंधकर घर पिछाडी, दत्तमंदिर ते कमानी हौद, राजसपुरा पेठ, दुर्गा पेठ या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी कास माध्यमातील कात्रेवाडी टाकीवरील रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार पेठ, कोल्हटकर आळी, नागाचा पार, मनामती चौक, शहापूर माध्यमातील गुरुवार टाकी दुसरा झोनमधील गुरुवार पेठ जमदाडे घर ते शिर्के शाळा, शिर्के शाळा ते कमानी हौद पिछाडी-शिर्के शाळा ते पटवर्धन गैरेज, शनिवार पेठकल्पकसहवास अपार्टमेंट परिसरतेवाघाची नळी परिसर, न्यू इंग्लिश स्कूल दगडी शाळा कोपरा ते खणआळी, लंबेबोळ तसेच गणेश टाकीवरुन पाणी पुरवठा होत असलेला परिसर, समर्थ मंदिर चौक ते हत्तीखाना, सोमवार पेठ परिसर, बागवान गल्ली, दैवज्ञ मंगल कार्यालय, चौक ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा परिसर, जानकीबाई झंवर शाळा परिसर, खडेकेश्वर शाळा परिसरास पाणीपुरवठा होणार नाही.
शुक्रवारी कास माध्यमावरील सकाळी सहा ते सकाळी आठ यावेळेत संत कबीर सोसासटी व पोळ वस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्मावती परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, धस काॅलनी, दस्तगीरनगर परिसर, तसेच शहापूर माध्यमावरील बुधवार नाका टाकीवरील बुधवार नाका ते बाबर काॅलनी, एकता काॅलनी, रघुनाथपुरा पेठ व शेंडे काॅलनी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी कास माध्यमावरील मेन लाईन सकाळी आठ ते सकाळी नऊ (गोल टाकी लाईन) संत कबीर सोसायटी व पोळ वस्ती (निळी लाईन), शहापूर माध्यमातून यशवंत गार्डन पहिला झोन, भवानी शाळा, एलबीएस काॅलेज परिसर, रावखंडे बोळ, दुर्गा पेठ, रविवार पेठ, सर्वोदय काॅलनी, लोणार गल्ली, कैकाड गल्ली ते मरिआई काॅम्प्लेक्स, जगताप काॅलनी, पंताचा गोट परिसर, खंडोबा माळ, वडार वस्ती, बडेकर व कांबळे वस्ती, ७६ मल्हार पेठ परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
रविवारी कास माध्यमावरील बोगदा परिसर, खापरी लाईन चार नंबर टाकीवरुन वितरीत करण्यात येणारे बोगदा ते माची पेठ अदालत वाडा परिसर, बालाजी अपार्टमेंट व कांबळे वस्ती, जांभळेवाडा परिसर, शहापूर माध्यमावरील यशवंत गार्डन दुसरा झोन, मल्हार पेठ, बडेकर वस्ती, ढोर गल्ली, नकाशपुरा, सावकार गॅरेज ते शनिवार पेठ आदी परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान, नागरिकांनी उपलब्ध पाणीपुरवठ्याचा वापर काटकसरीने करावा व पाण्याची बचत करावी, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी सचिन पवार, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.