
तारळे: वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील फरारी संशयितास तारळे- जंगलवाडी मार्गावर उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. सूरज संपत साळुंखे (वय २९, रा. नागठाणे, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. वर्षापूर्वी वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात संबंधित संशयित फरारी होता. उंब्रज पोलिसांनी त्यास वेशांतर करून शिताफीने अटक केली.