ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर कुसूरच्या युवकाचा निघृण खून; पोलिस घटनास्थळी दाखल, खुनामागचं कारण अस्पष्ट

कुसूर (ता. कऱ्हाड) येथील एका युवकाचा ढेबेवाडी येथे खून झाल्याची घटना काल (सोमवार) रात्री घडली.
Dhebewadi Police
Dhebewadi Policeesakal
Summary

वांगनदीपासून अलीकडेच ढेबेवाडी - कऱ्हाड रस्त्याला जोडून तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ढेबेवाडी : कुसूर (ता. कऱ्हाड) येथील एका युवकाचा ढेबेवाडी येथे खून झाल्याची घटना काल (सोमवार) रात्री घडली. ऋतुराज दिलीप देशमुख (वय ३१) असे संबंधित खून झालेल्या युवकाचे नाव असून या खुनामागचे नेमके कारण उलगडण्याचे आणि संशयितांचा शोध घेण्याचे काम येथील पोलिसांकडून (Dhebewadi Police) वेगाने सुरू आहे.

वांगनदीपासून अलीकडेच ढेबेवाडी - कऱ्हाड रस्त्याला जोडून तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत येथील पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले.

Dhebewadi Police
राज्यात एनआयएचे 11 ठिकाणी छापे; 'इसिस'चे नेटवर्क उद्‍ध्वस्त, बंगळुरात सात किलो सोडियम नायट्रेट जप्त

घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी स्थितीत पडलेला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना अँब्युलन्सने उपचारासाठी कऱ्हाडला नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Dhebewadi Police
कोकणात शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजानीमा, राजकीय चर्चांना उधाण

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, तसेच पाटण तालुक्यातील विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com