esakal | 'कृष्णा'च्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसलेंची बिनविरोध निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Suresh Bhosale

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले, तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

'कृष्णा'च्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसलेंची बिनविरोध निवड

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Co-operative Sugar Factory) नूतन अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले (Dr. Suresh Bhosale), तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप (Jagdish Jagtap) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर (Election Officer Prakash Ashtekar) यांनी काम पाहिले. आज सकाळी झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत निवडी पार पडल्या. नुकतीच कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक (Factory Five-year Election) झाली. यात तिरंगी लढतीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने (Jayawantrao Bhosale Co-operation Panel) 21 जागांवर मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. (Unopposed Selection Of Dr. Suresh Bhosale As President Of Krishna Sugar Factory Satara Political News)

सकाळी कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. सकाळी अकरा वाजता निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. अकरा वाजून 45 मिनिटांनी श्री. आष्टेकर यांनी डॉ. भोसले व श्री जगताप यांच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यस्थळावर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा झाला. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा आष्टेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कामकाज पूर्ण केले. डॉ. भोसले म्हणाले, सभासदांनी आम्हाला दुसऱ्यांदा संधी दिल्याने जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीतील मताधिक्य पाहता नूतन संचालकांना मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. सध्या साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी आहेत. पुढील काळात सभासदांना उत्तम दर देण्यामध्ये कृष्णा कारखाना पुढे कसा राहील, याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करू. कारखाना व सभासदांचा विकास साधण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करून त्याप्रमाणे कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

हेही वाचा: कऱ्हाडात 18 घंटागाड्यांसह तीन ट्रॅक्टर बंद

11 हजार लाडूंचे वाटप

कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवला. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात विजया प्रीत्यर्थ कारखान्याच्या वतीने 11 हजार 111 लाडूंचे वाटप करण्यात आले.

Unopposed Selection Of Dr. Suresh Bhosale As President Of Krishna Sugar Factory Satara Political News

loading image