esakal | विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार I ShivSena
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena

गोडसे यांच्या शिवसेना प्रवेशाने खटाव तालुक्यात पक्षाला निश्चित ऊर्जा मिळणार आहे.

विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज : नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे (Opposition Leader Shahaji Godse) यांच्या शिवसेना (ShivSena) प्रवेशाने खटाव तालुक्यात पक्षाला निश्चित ऊर्जा मिळणार असून, विकासकामांसाठी पक्ष शहाजीराजे गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते दिवाकर रावते (Divakar Ravate) यांनी सांगितले. मुंबई येथे श्री. गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी श्री. रावते बोलत होते.

यावेळी सातारा-सांगली संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, विधानसभा संपर्कप्रमुख शंकर वीरकर, उपतालुकाप्रमुख संजय भोसले, क्षेत्रप्रमुख सचिन भिसे, तालुकाप्रमुख युवराज पाटील, उपतालुकाप्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, शहरप्रमुख सुशांत पार्लेकर, विभागप्रमुख आबासाहेब भोसले आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रा. बानुगडे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या संकल्पनेनुसार शिवसेनेचे काम चालते. शहाजीराजे गोडसे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खटाव तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक बळकट होण्यास मदत झाली. पक्षाच्या माध्यमातून त्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’

हेही वाचा: BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी?

Shahaji Godse

Shahaji Godse

शहाजीराजे गोडसे म्हणाले, ‘‘चळवळीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे खटाव तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्य विकासाच्या शिखरावर पोचले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे करून शहराचा कायापालट करण्याबरोबच पक्षवाढीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यात येतील.’’

loading image
go to top