Nagpanthi Protest in Satara: विविध मागण्यांसाठी नागपंथी समाजाच्या वतीने साताऱ्यात मोर्चा
Nagpanthi Community Demands : यशवंतराव चव्हाण पाल मुक्त योजना स्वतंत्रपणे राबवावी. भूमिहीनांना गायरान जमिनी द्याव्यात, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळावा, नाथपंथी समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कारुंडे (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथे धर्मपीठ उभे करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
"Nagpanthi community stages a peaceful rally in Satara demanding justice, reservation, and social inclusion."esakal
सातारा: नागपंथी समाजाने आज आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय नागपंथी समाज संघर्ष समितीचे सदस्य बाळासाहेब लगस आणि जॉनटी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सवाद्य मोर्चा काढत घोषणाबाजी केली.