
-स्वप्नील शिंदे
सातारा : रोजगार हमी योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक अकुशल मजुरांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत ‘दै. सकाळ’ने आवाज उठवल्यानंतर नागपूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आयुक्तालयातून दखल घेण्यात आली असून, संबंधित अदृश्य खात्यांची चौकशी करण्याचे आदेश आले आहेत.