esakal | तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

बोलून बातमी शोधा

Nandkishore Patil
तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : तांबवे येथील नंदकिशोर आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलिसमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे. लहानपणापासूनच पोलिस अधिकारी होण्याची जिद्द असलेल्या नंदकिशोरने कोणत्याही क्लासविना यश मिळवून देशाच्या राजधानीत तांबवे गावचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे गावाचाही लौकीक वाढला आहे.

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून महाराष्ट्रात तांबवे गावची ओळख आहे. तेथे घरटी स्वातंत्र्य सैनिक होते. त्याकाळी गावाने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या पंढरीत वाढलेला नंदकिशोर याने कोणत्याही क्लासविना स्वतः अभ्यास करुन केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या परीक्षेत यश मिळवून पोलिस उपनिरीक्षपदी आपले नाव कोरले आहे. देशातून परीक्षेसाठी आठ लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये एक हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये देशात ७१ वा क्रमांक पटकावून नंदकिशोर यशस्वी झाला आहे. त्यामुळे तांबवे गावच्या लौकीकात भर पडली आहे.

नागरिकांनो, थोडंतरी जबाबदारीचं भान ठेवा; सभापती रामराजेंचं आवाहन

त्याच्या यशाबद्दल बोलताना नंदकिशोर म्हणाला, केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. त्याअंतर्गत सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशनतर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. यावेळच्या परीक्षेत देशातून आठ लाख मुलांमध्ये माझा ७१ वा क्रमांक आला आहे. माझ्यासाठी हे मोठे यश आहे. हे यश मी कोणताही क्लास न लावता तांबवे सारख्या खेड्यातील घरी स्वतः अभ्यास करुन मिळवले आहे. तरुणांनी कोणतेही काम, अभ्यास मन लावून केला की यश मिळतेच. त्यासाठी ध्येय ठरवून अभ्यास करावा.  

आरोग्य सुविधा आमदार निधीतून देऊ; शशिकांत शिंदेंची खटावात ग्वाही

शेतकरी कुटंबाचा झाला सन्मान

नंदकिशोर शेतकरी कुटंबातील आहे. त्याचे वडील आण्णासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य असुन ते शेतकरी आहेत. त्याचबरोबर त्यांचे चुलते विकास पाटील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत तर चुलत भाऊ उत्कर्ष पाटील हे ही चांगले शेतकरी आहेत. नंदकिशोरच्या यशाने शेतकरी कुटुंबाचाच सन्मान झाला आहे. 

Edited By : Balkrishna Madhale