अशाेक चव्हाणांवर नरेंद्र पाटलांची जहरी टीका; मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदेंना करा

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 4 November 2020

आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले आहे असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.

सातारा : मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना बाजूला करुन एकनाथ शिंदे यांना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी अशोकराव चव्हाणांनी मराठा समाजाला याेग्य दिशा दिलेली नाही. चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला. त्यामुळे अशोक चव्हाणांना पदावरून काढून टाका अशी मागणी आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी क-हाड येथे केली आहे. एक वृत्तवाहिनीशी बाेलताना पाटील यांनी चव्हाणांनी समाजाला थर्ड लावल्याची जहरी टीका केली आहे.

शिवसेना भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याने त्यांना बाजूला केले पाहिजे. यामध्ये मोठं योगदान असलेल्या एकनाथ शिंदे हे अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली होती असं पाटील यांनी नमूद केले.

राज्य सरकारकडून माध्यमांची गळचेपी, चंद्रकांत पाटलांचा आरोप 

ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांचे त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होतं. त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते.

मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेंनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले आहे असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होताना सरपंच निवड ही जुन्या नियमानुसार होणार, की नवीन याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Patil Demands To Remove Ashok Chavan From Chairmanship Of Maratha Reservation Committee Satara News