'मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला'

आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून मी काम पाहिले. 13 हजार कोटींची मदत देत 20 हजार मराठा तरुणांना फायदा झाला.

'मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला'

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा शेवटच्या श्वासापर्यंत पुढे घेऊन जाणार आहे. माझ्या वडिलांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारच्या विरोधात आंदोलनाचा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मराठ्यांनो जागे व्हा, जागे व्हा, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले.
 
नवारस्ता (ता. पाटण) येथे पाटण तालुका सकल मराठा समाजाच्या पाटण तालुक्‍याच्या वतीने नवारस्ता येथे नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ढेबेवाडीचे भरत पाटील, पवन तिकुडवे, रमेश सूर्यवंशी, रवी पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले, ""न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून मी काम पाहिले. 13 हजार कोटींची मदत देत 20 हजार मराठा तरुणांना फायदा झाला.

मात्र, या सरकारने मी मराठा आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जात असल्याचे समजल्यावर माझ्यावर दबाव टाकला. तो दबाव मी झिडकारत या पदाला लाथ मारत राजीनामा दिला. ही चळवळ यापुढेही मोठ्या जोमाने पुढे घेऊन जाणार आहे.'' भरत पाटील, नितीन सत्रे, अनिल संकपाळ, सचिन देसाई, भूषण जगताप, पवन तिकुडवे यांनी मनोगत व्यक्त केले.

भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार 'डीएसपी'

शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत, लागलेच तर त्याचा नाद संपवल्याशिवाय गप्प बसत नाहीत'

ग्रामपंचायतीच्या अंगणात पेटवली चुल; जेवणाचा लुटला आनंद

आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top