
जिल्हा परिषदचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापती व कृषी उत्पन्न बाजार समिती अशी तालुक्यातील महत्त्वाची पदे शिरवळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे असताना येथील शहर राष्ट्रवादीमधील दुफळी हा मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत आमदार मकरंद पाटील काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा : शिरवळ ग्रामपंचायतीमधील राजकीय घडामाडी कमी होताना दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या थेट सरपंचांच्या दुसऱ्यांदा झालेल्या मतदान प्रक्रियेद्वारे राजकीय गणिते खेळली गेली. ही राजकीय धूळ खाली बसत नाही तोपर्यंत शिरवळ शहर राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी उफाळू लागली असून, विद्यमान उपसरपंच सुनील देशमुख हे आपल्या पदाचा राजीनामा पक्षनेत्यांकडे देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या चर्चेला खुद्द श्री. देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ जास्त असूनही शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंच निवडून आले आहेत. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाच्या वतीने आठ फेब्रुवारी 2018 रोजी श्री. देशमुख हे उपसरपंचपदी विराजमान झाले. भाजपचे थेट सरपंच निवडून आल्याने राष्ट्रवादीने न्यायालयीन प्रक्रिया व थेट मतदान प्रक्रिया राबवत या पदाला नेहमी विरोध दर्शवला. मात्र, आता शहर राष्ट्रवादींतर्गत दुफळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व इतर किरकोळ विषयांवर राष्ट्रवादीच्या बाजूने ठराव आल्यावर राष्ट्रवादीचे सदस्य विरोध करत असल्याबाबत उपसरपंच देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापती व कृषी उत्पन्न बाजार समिती अशी तालुक्यातील महत्त्वाची पदे शिरवळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे असताना येथील शहर राष्ट्रवादीमधील दुफळी हा मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत आमदार मकरंद पाटील काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!
छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; महाविकासच्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट
""मी आमदार मकरंद पाटील यांना मानणारा असून, मी उपसरपंचपदाचा राजीनामा देणार असलो, तरी श्री. पाटील यांच्या विचारानेच काम करणार आहे.''- सुनील देशमुख, उपसरपंच, शिरवळ ग्रामपंचायत
वैभवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या मालुसरेंच्या जन्मभूमीचा कायापालट करणार
Valentines Day : तेरे संग यारा खुशरंग बहारा.. पाचगणी, महाबळेश्वरच्या सुखद गारव्यात व्यक्त करा प्रेम