
Navratri Festivities in Bhuinj
Sakal
भुईंज : येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवीच्या रजतलक्ष्मी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात महालक्ष्मी देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी श्री महालक्ष्मी देवी देवस्थानच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.