
-अशपाक पटेल
खंडाळा : सर्व समाजातील स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव (ता. खंडाळा) मध्ये युवतींसाठी सैनिक ॲकॅडमी उभारण्याची घोषणा अद्याप हवेतच राहिली आहे. पर्यटन विभागाने कोट्यवधी रुपयांची उभारलेली इमारत ही अनेक वर्षांपासून रस्ताच्या व हस्तांतराच्या अभावी धूळखात पडून आहे.