'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सच्चा कार्यकर्त्याला अध्यक्षपद द्या'

NCP
NCPesakal
Summary

'बॅंकेतील मक्तेदारी संपवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खऱ्या संचालकाला अध्यक्षपद मिळावे.'

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हा बॅंकेतील मक्तेदारी संपवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress Party) खऱ्या संचालकाला अध्यक्षपद मिळावे. त्यासाठी बॅंकेचं अध्यक्षपद माजी खासदार (कै) लक्ष्मणराव पाटील (Laxmanrao Patil) यांचे पुत्र नितीन पाटील यांनाच द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील खासदार पाटील समर्थकांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याकडे आज केली.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) सहकारमंत्री पाटील विजयी झाल्याबद्दल कोरेगाव तालुक्याच्या वतीने त्यांचा सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील व सहकाऱ्यांनी सत्कार केला. त्यानंतर त्यांनी सहकारमंत्री पाटील यांच्याकडे खासदार (कै) पाटील यांच्या पश्चात नितीन पाटील (Nitin Patil) यांना अध्यक्ष करावे, अशी मागणी केलीय. त्यानंतर बोलताना सह्याद्रीचे संचालक कांतीलाल पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेत सहकाराची मक्तेदारी संपवून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील चांगल्या मताने विजयी झाले आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांकडे आले आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याला द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.

NCP
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'
Nationalist Congress Party
Nationalist Congress Party

माजी खासदार (कै) लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil), नितीन पाटील यांनी गटतट विसरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम करुन सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीच्याच संचालकाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद मिळाले पाहिजे. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळून जिल्हा बॅंकेतील मक्तेदारी संपेल. त्यासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नितीन पाटील यांना द्यावे, ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

NCP
मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com