बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही : हसन मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif

भाजप आघाडीचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे.

'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

कोल्हापूर : राज्यातील विधानपरिषेदच्या (Vidhan Parishad Election) सहा जागांसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी दिल्लीत हालचाली सुरु होत्या. त्यामुळं कोल्हापूरच्या जागेच काय होणार, याकडं राज्यातील नेत्यांचं लक्ष लागलं होतं. त्यातच आज मुंबई, धुळे-नंदुरबार या जागांच्या बदल्यात भाजपनं कोल्हापूरची जागा सोडली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दिल्लीवरून विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश आल्यानंतर कोल्हापूरचे भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप आघाडीचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्या माघारीनंतर पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत कागलमधील एका कार्यक्रमात मंत्री सतेज पाटील (Satej Patil) निवडून आले आहेत, केवळ त्यांचा फाॅर्म भरण्याची औपचारिकताच राहिलीय, असं विधान मी त्यावेळी केलं होतं. गोकुळ निवडणुकीतही असंच बोललो होतो, त्यामुळं सतेज पाटलांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

हेही वाचा: इथून पुढच्या सर्व निवडणूका भाजपच्या झेंड्याखालीच ; धनंजय महाडिक

मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या सहा वर्षात बंटी पाटलांनी पंचायत समिती, नगरपालिकांसोबत ठेवलेला संबंध व नगरसेवक यांच्याशी केलेली जवळीकता याचा त्यांना लाभ झाला आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि बंटी पाटील पालकमंत्री झाल्यानंतर, जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. त्यामुळं विकासकामेही तितकीच झाली आहेत. गेल्या दोन वर्षात बंटी पाटलांनी सर्वांशी इतकी जवळीकता निर्माण केली की, भाजपलाही याचा पत्ता लागला नाही. हा विजय विकासकामांवर मिळवेला विजय असल्याचंही त्यांनी शेवटी सांगितलं.

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

loading image
go to top