काँग्रेसच्या 'करेक्ट' कार्यक्रमानंतर सहकारमंत्र्यांचा झळकला 50 फुटी बॅनर

Balasaheb Patil
Balasaheb Patilesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी नुकताच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी (Karad Society) गटात विजय मिळवला. त्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री पाटील यांचा कऱ्हाडच्या कृष्णा नाक्यावर तब्बल 50 फुटी कटाउट उभारले आहे. हे कटाउट उंच असल्याने लक्षवेधी ठरले आहे. त्याचीच सध्या कऱ्हाड शहरासह तालुक्यात चर्चा सुरु आहे.

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांनी लढत दिली. मात्र, त्यामध्ये सहकारमंत्र्यांनी बेरजेचे राजकारण करत थेट पारंपरिक विरोधक असलेल्या भाजपच्या भोसले गटालाच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील मदतीसाठी घेत विजय मिळवला.

Balasaheb Patil
'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सच्चा कार्यकर्त्याला अध्यक्षपद द्या'

सहकारमंत्री पाटील यांना 74 मते पडली, तर अॅड. उंडाळकर यांना 66 मतांवरच रोखण्यात सहकारमंत्र्यांना यश आले. सहकारमंत्र्यांनी वर्षापासून त्यासाठी नियोजन केले होते. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. दरम्यान, या विजयामुळे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. त्यांनी सहकारमंत्र्यांच्या विजयाचे औचित्य साधून कऱ्हाडच्या कृष्णा नाक्यावर त्यांचे तब्बल ५० फुटी कटाउट उभारले आहे. हे कटाउट उंच असल्याने लक्षवेधी ठरले आहे. त्याचीच चर्चा कऱ्हाड शहरासह तालुक्यात सुरु आहे.

Balasaheb Patil
'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com