कऱ्हाड-चिपळूण मार्गावर राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

विजय लाड
Friday, 23 October 2020

कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गावरील घाटमाथा ते पाटण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे भरण्याची मलमपट्टी थांबवा व तातडीने रस्त्याचा प्रश्न निकाली काढा या प्रमुख मागणीसाठी कोयना विभाग राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी हेळवाक येथे रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

कोयनानगर (जि. सातारा) : कऱ्हाड-चिपळूण खड्डेयुक्त राज्यमार्गावर खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हे कुणालाच समजत नसले तरी या खड्ड्यात कोयना विभागातील जनता आहे. जनतेला सुविधा पुरविण्यासाठी शासन अपयशी ठरले असून हे सुशासन आहे का, असा प्रश्न जनतेला पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी करून कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्ग अर्धा तास रोखून धरला.

कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गावरील घाटमाथा ते पाटण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे भरण्याची मलमपट्टी थांबवा व तातडीने रस्त्याचा प्रश्न निकाली काढा या प्रमुख मागणीसाठी कोयना विभाग राष्ट्रवादी काँग्रेसने आज शुक्रवारी हेळवाक येथे 11.30 ते 12.00 पर्यंत रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे, माजी सभापती पूजा कदम, मेंढेघरचे उपसरपंच बाळासाहेब कदम, राम मोहिते, रामभाऊ मोरे, संपत जाधव, रमेश जाधव, पंकज गुरव, बापू चव्हाण, दाजी पाटील, वसंत कदम आदी प्रमुख कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

साहेब, माझा कुणावरच भरवसा न्हाय.. आता मी काय करू;  हताश माउलीची दरेकरांना साद

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या उपअभियंता पी. जी. बारटक्के यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. या रस्त्यांसाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामास सुरवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं लसीकरण; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

गृहराज्यमंत्र्यांचा तालुक्याला उपयोगच नाही

पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे उत्कृष्ट संसदपटू लोकप्रतिनिधी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे जरी सत्य असले तरी त्याचा तालुक्याला उपयोग नसल्याची उपरोधिक टीका यावेळी आंदोलकांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Agitation On Karad-Chiplun Road Satara News