राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन?

खासदार पवार यांनी ही इंजेक्‍शन गंभीर पण गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यासाठी दिली होती. मात्र, या इंजेक्‍शनचा गैरवापर झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार पवार यांच्याकडून जिल्ह्याला मिळालेल्या 175 इंजेक्‍शनचे रेकॉर्ड जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन?

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्याला दिलेली रेमडिसिव्हर काही इंजेक्‍शन जिल्हा रुग्णालयातून चोरीस गेली आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयास वेळोवेळी विचारणा केली आहे. मात्र, रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ही इंजेक्‍शन नेमकी गेली कुठे? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  

खासदार शरद पवार यांनी कोरोना संसर्गामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना जीवदान देण्यासाठी मागील महिन्यात 125 इंजेक्‍शनचे दोन बॉक्‍स जिल्हा रुग्णालयाला दिले होते. तसेच कऱ्हाड येथील कार्यक्रमात आणखी 50 इंजेक्‍शन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. त्यामुळे एकूण 175 इंजेक्‍शन खासदार पवार यांनी दिली होती. यातील काही इंजेक्‍शन चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. 

पगारदारांनो... सातारा जिल्हा बॅंकेने आणली तुमच्यासाठी अनाेखी याेजना

Video : जावळीतील पांडवकालीन मरडेश्वर शिवलिंग

मुळात ही इंजेक्‍शन कोणत्या रुग्णांना किती दिली, याचा तपशील जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा मागितला होता. मात्र, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यातील काही इंजेक्‍शन ही रुग्णालयातून परस्पर लंपास करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. खासदार पवार यांनी ही इंजेक्‍शन गंभीर पण गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यासाठी दिली होती. मात्र, या इंजेक्‍शनचा गैरवापर झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार पवार यांच्याकडून जिल्ह्याला मिळालेल्या 175 इंजेक्‍शनचे रेकॉर्ड जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड  

जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटणार : सुनील माने 

जिल्हा रुग्णालयातून रेमडिसिव्हर इंजेक्‍शनची चोरी झाल्याचे समजले आहे. आम्ही यापूर्वीही जिल्हा रुग्णालयाकडून कोणाला ही इंजेक्‍शन दिली, याची माहिती मागितली होती. पण, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता उद्या (सोमवार) आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून याची यादीच घेणार आहोत. त्यामुळे चोरीचा नेमका प्रकार समजून येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Web Title: Ncp Demands Inquiry About Remdesivir Injection Stolen Civil Hospital Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top