गोपीचंद पडळकरांचे बाेलणे हा निव्वळ पोरकटपणा : जयंत पाटील

उमेश बांबरे
Monday, 15 February 2021

पंतप्रधान नरेंद्र माेदींनी शेतकऱ्यांशी विश्‍वासाने चर्चा केली असती तर हे आंदोलन थांबले असते असेही मंत्री जयंत पाटील यांनी नमूद केले.

सातारा : आपण काेणाबद्दल बाेलताे हे बाेलणा-यास समजले पाहिजे. एखाद्या थाेरा मोठ्या व्यक्तीवर टीका करून जनतेसह अन्य सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी आक्रस्थाळीपणाची विधाने गोपीचंद पडळकर यांच्याकडून केली जात आहेत. स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तेथे जाऊन ते थांबवणे हा पोरकटपणाच म्हणावा लागेल. राजकारणात किती खालच्या थराला जायचे, याचा हा एक नमुना आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना फटकारले. 

सातारा शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री उशिरा मंत्री पाटील आले होते. त्यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अविनाश मोहिते, "राष्ट्रवादी युवक'चे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

दरम्यान दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर पाटील  म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांची चूक हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. पंतप्रधानांनी हट्ट करणे बरोबर नाही. चार पावले मागे येऊन शेतकऱ्यांशी विश्‍वासाने चर्चा केली असती तर हे आंदोलन थांबले असते.'' या वेळी श्री. पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. राजकारणात किती खालच्या थराला जायचे, याचा हा एक नमुना आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; महाविकासच्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट\

CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख

राष्ट्रवादींतर्गत बंडाळी उफाळली? मकरंद पाटलांच्या भूमिकेकडे खिळून राहिल्यात नजरा

साऊथ इंडियन पद्धतीने बनवा बैंगन करी, चव चाखाल तर पुन्हा मागाल

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Jayant Patil Cirticised Gopichand Padalkar Satara Marathi News